support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

५ सप्टेंबर २०२२ शिक्षक दिन

        भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी विद्यार्थांनी शिक्षक, प्राचार्य, उपप्राचार्य, क्रीडा शिक्षक, शिपाई म्हणून भूमिका पार पाडली.

        डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित विद्यार्थी शिक्षकांनी व शिक्षकांनी मनोगत  व्यक्त केले.  कार्यक्रम वेळी डॉ.विजय बिडकर महाविद्यालायचे प्राचार्य श्री.पाटील सर, उपप्राचार्या श्रीमती.पवार madam (म्याडम), डॉ.विजय बिडकर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.सागर सर, पर्यवेक्षक  श्री.मोरे सर, शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी तसेच विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उपस्थित प्राचार्य, उपप्राचार्या, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार केला.

        

उपप्राचार्या मनोगत व्यक्त करतांना

प्राचार्य मनोगत व्यक्त करतांना

परिपाठ घेते वेळी विधार्थी शिक्षक व शिक्षिका