support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त  विनम्र अभिवादन

डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त  विनम्र अभिवादन
पेठ, ता. ४ - डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ, व्यवसाय अभ्यासक्रम, पेठ, जनता कन्या वसतिगृह, जनता विद्यार्थी वसतिगृह, कर्मवीर दादासाहेब बिडकर विद्यार्थी वसतिगृह,पेठ येथे संस्थेचे माजी सचिव, अारोग्य सेवक, क्रीडाप्रेमी, वाचनाचे व्यासंगी, वाचन प्रेमी, आदिवासींचे उध्दारक, स्वर्गीय डाॅ. विजयजी बिडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने डाॅ. साहेबांच्या पुतळ्याचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर. एम. सर होते. यावेळी विद्यार्थ्यांची वक्तृत्त्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विद्यालयाचे शिक्षक श्री केला डी जी, श्रीमती आचार्य व्ही. सी. श्री बाबाजी अहिरे, उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी. मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील सर यांनी अध्यक्षीय भाषणात डाॅ. साहेबांच्या कार्याची व विचारांची माहिती विद्यार्थ्यांना करुन दिली. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर, उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी.मॅडम, वसतिगृह अधिक्षक श्री जितेंद्र सुर्यवंशी, श्री. दोडे विनायक, श्रीमती स्वाती पाटील, सर्व शिक्षक, क.म.वि.शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.