support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
पेठ, ता. १२- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे थोर स्वातंत्र्य सेनानी, आदिवासी सेवक, नाशिक भूषण, दलितमित्र, कर्मवीर दादासाहेब बिडकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक श्री सागर ए. एम. होते. यावेळी प्रथम  प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी., पर्यवेक्षक श्री केला डी.जी. श्रीमती आचार्य व्ही.सी., केदार सी. डी., बाबाजी अहिरे, कुलकर्णी एस.एस. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी श्री सागर ए. एम. यांनी अध्यक्षीय मनोगतातून कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.