[email protected] +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

डॉ.विजयबिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे युवा सप्ताह निमित्त विजयश्री मॅरेथॉन व वकृत्व स्पर्धेचे आयोजन

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग पेठ येथे
🌹  युवा सप्ताह निमित्त विजयश्री मॅरेथॉन व वकृत्व स्पर्धेचे आयोजन 🌹 
     🌷🌷🌷🌷🌷🌷🌷     पेठ -  दिनांक 13/01/2025 वार सोमवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी  करण्यात आली.या निमित्ताने विद्यालयात दिनांक 12 जानेवारी ते 17 जानेवारी या दरम्यान युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.तसेच सोमवार दि.13 जानेवारी रोजी विजयश्री मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री आर.एम.पाटील उपमुख्याध्यापक श्री एम.एस.मोरे पर्यवेक्षक श्री डी.जी.केला उपप्राचार्य सौ.व्ही.सी.आचार्य श्री.पी.आर. वेढणे यांच्या प्रमुख उपस्थितीत  सुरुवात करण्यात आली.त्यानंतर विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर आधारित वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यावेळी मॅरेथॉन स्पर्धेतील सर्व विजयी विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
 मॅरेथॉन स्पर्धेचे विजयी विद्यार्थी: 
 5वी ते 7वी गट मुले 1 कि.मी 
प्रथम- जाधव अमोल चंदर 
द्वितीय- राऊत पुंडलिक प्रमोद
तृतीय- गहले प्रेषित गणपत
 5वी ते 7वी गट मुली 1 कि मी 
प्रथम- दळवी संध्या जगन्नाथ
द्वितीय- दहावाड वैष्णवी मधुकर
तृतीय- कोदी ख्रिस्ती प्रभाकर
 8वी ते 10वी गट मुले 3 कि मी 
प्रथम- गहले प्रेम छगन
द्वितीय- पवार विजय सुनिल 
तृतीय- लोहार प्रकाश तुकाराम
 8वी ते 10वी गट मुली 2 किमी 
प्रथम- दरोडे मनिषा पंडित
द्वितीय- सहारे माधुरी प्रभाकर
तृतीय- थाळकर अर्चना महेंद्र 
 11वी ते 12वी गट मुले 4 किमी 
प्रथम- राथड स्तवन कालिदास
द्वितीय- भोये सागर पंडित
तृतीय- लोहार नितीन पुंडलिक
 11वी ते 12वी गट मुली 3 किमी 
प्रथम- पवार तेजस्विनी दौलत 
द्वितीय- खेत्री ज्योस्तना भिवा
तृतीय- गायकवाड अनिता जयराम