support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर.,एम. होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री केला डी.जी., श्रीमती पवार जे. पी., बाबाजी अहिरे, केदार सी.डी. यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या कार्याचा परिचय करून दिला. शेवटी पाटील सरांनी  मनोगत व्यक्त केले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.