support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

डाॅ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे, शाडु माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

डाॅ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे, शाडु माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न
पेठ, - डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे शाडु माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दि १२ सप्टेंबर २०२३ रोजी या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. सर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री. सागर ए.एम., पर्यवेक्षक श्री. केला डी.जी. उपस्थित होते. याकार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक श्री कुलकर्णी एस.एस., चित्रकला शिक्षिका श्रीमती हुंडीवाले ए.बी. यांनी परिश्रम घेतले.
याकार्यशाळेत, एकुण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गणपती मुर्ती तयार केल्या. 
नदी प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. तसेच यावर्षी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला.