support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

डॉ.विजय बिडकर विद्यालय पेठ यथे विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

डॉ.विजय बिडकर विद्यालय पेठ यथे विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न
पेठ, ता -१८- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यातीलच आज विद्यार्थ्यांची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यात सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व डॉक्टर विजयजी बिडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर अनिलकुमार होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. कांतीलाल राऊत व श्री महेश डबे होते. या स्पर्धा तोंडवळ रस्त्याला घेण्यात आल्या. यात एक किलोमीटर, दोन किलोमीटर, तीन किलोमीटर व चार किलोमीटर धावण्याच्या स्पर्धा घेतल्या. यावेळी उपप्राचार्य श्रीमती पवार जे. पी. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेत पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.
एक किलो मीटर धावणे ५ वी ते ७ वी मुले
प्रथम कडाळी संदीप कांतीलाल ७ वी
 द्वितीय अलबाड निरंजन नामदेव ७ वी 
तृतीय राऊत पुंडलिक प्रमोद ६ वी
५ वी ते ७ वी मुली 
प्रथम कोदी रुपाली प्रभाकर -७ वी, द्वितीय निंबारे कल्पना देविदास ७ वी, तृतीय नाईक नेहा अजय ७ वी
दोन किलोमीटर धावणे
८ ते १० मुली 
प्रथम थाळकर अर्चना महेंद्र  ८ वी, द्वितीय दरोडे मनीषा पंडित ८ वी, तृतीय शिंगाडे सोनाली जगन, १० वी  
तीन किलोमीटर  ८ ते १० मुले
प्रथम चौधरी मयूर शांताराम १० वी अ, द्वितीय गहले आशिष सुरेश, ९ वी, तृतीय गहले प्रेम छगन ९ वी
तीन किलोमीटर ११ वी ते  १२ वी मुली
प्रथम पवार मंगला मधुकर ११ वी अ, द्वितीय गहले कविता विजय ११ वी, तृतीय बागुल नंदिनी मनोहर ११ वी
चार किलोमीटर ११ वी १२ वी मुले
प्रथम गावंडे चंद्रशेखर नामदेव १२ वी
द्वितीय खेत्री नंदराज नवसु १२ वी
तृतीय भोये सागर पंडित ११ वी
वाघ सागर गिरीधर १२ वी- उत्तेजनार्थ