support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा

गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा
पेठ, ता. २२- आज डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे प्रसिध्द गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. होते. याप्रसंगी सर्वप्रथम डाॅ. रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. नंतर श्री केला डी. जी., श्री केदार सी. डी.,  श्रीमती पवार एस. सी. यांनी आपल्या मनोगतातुन डाॅ. रामानुजन यांचा जीवन व कार्याचा परिचय करुन दिला. शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री पाटील सरांनी डाॅ. रामानुजन यांचे विचार व कार्याचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम., पर्यवेक्षक श्री मोरे एम.एस., सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी गणित विषयाची शपथ घेतली.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले तर आभार श्री पगार सी. बी. यांनी मानले.