support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'स्वराज्य महोत्सव' व 'हर घर झेंडा' अभियान अंतर्गत आज विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. या निमत्ताने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम.,  उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. पर्यवेक्षक श्री मोरे एम.एस. उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी., श्री. अाहेर टी.टी. सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आज १४ आॅगस्ट विभाजन विभीषिका स्मृती दिन ( फाळणी स्मृती दिवस) विद्यालयात साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर.एम.होते. याप्रसंगी सर्वप्रथम स्वातंत्र्यसेनानी कर्मवीर दादासाहेब बिडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या  प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शिक्षकांनी विभाजन विभीषीका स्मृती दिना निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात   यावेळी थोर स्वातंत्र्य सेनानी, फाळणी म्हणजे काय, त्यावेळची देशाची परिस्थिती अशा वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यात उपमुख्याध्यापक श्री. सागर ए.एम.सर  पर्यवेक्षक श्री मोरे एम.एस.सर, उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी.मॅडम, श्री आहेर डी.टी., श्री शार्दुल के.वाय., श्री देशमुख के.के., श्री खुरकुटे जी. एन., श्री केला डी.जी., श्री. चव्हाण डी.एम., श्री देसाई पी.ए. श्री बागुल जी.बी.,श्री केदार सी.डी. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री पाटील आर एम सरांनी देशाच्या फाळणी विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनिषा हाडपे व श्री.ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले तर आभार श्री जाधव ए वाय यांनी मानले. 
त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समुहगीत व समुहनृत्य सादर केले. यासाठी श्रीमती पवार एस.सी.,श्रीमती गरुड एस के.,श्रीमती खंबाईत एच.व्ही. यांनी मार्गदर्शन केले. अशापध्दतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांनी विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.