support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ च्या विद्यार्थ्यांचे कथाकथन स्पर्धेत यश

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ च्या विद्यार्थ्यांचे कथाकथन स्पर्धेत यश
पेठ, ता. २७ - जनता विद्यालय अभोणा येथे डांग सेवा मंडळ, नाशिक व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत डांग सेवा मंडळ, नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील इ. ६ वी चा विद्यार्थी कु. वरद विनायक दोडे याने तृतीय क्रमांक पटकावला तर इ. ५ वी ची विद्यार्थिनी कु. मानभाव पुर्वा हेमराज हिला उत्तेजनार्थ  बक्षीस मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष मा. ताईसाहेब यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम.सर, उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. सर, पर्यवेक्षक श्री. मोरे एम.एस.सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.