support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
पेठ ता. 27- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक श्री सागर ए .एम. सर होते. यावेळी सर्व प्रथम डॉ. सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपप्राचार्य श्रीमती पवार जे. पी., पर्यवेक्षक श्री केला डी जी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री सागर ए. एम. यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यातून विज्ञान दिनाचे महत्व प्रतिपादन केले.  यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री केदार सी. डी. यांनी केले.