support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

पेठ जनता विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

पेठ येथील जनता विद्यालयातील स्नेहसंमेलनात समूहनृत्य सादर करताना बालवाडीतील चिमुकले.

पेठ : येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. यावेळी बालवाडीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गणेशवंदना ते शांताबाईपर्यंतच्या विविध कलाविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उदघाटन झाले. यावेळी सचिव डॉ. विजय बीडकर,संचालक ॲड. मृणाल जोशी, सेवक संचालक संजय जगताप, प्राचार्य ए. एम. बागुल, आर.बी. चौधरी, देवघरे आदि उपस्थित होते. दादासाहेब बीडकर इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी कलाकृती सादर केल्या, तर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, नाटिका, वात्रटिका सादर केल्या. पेठ येथील जनता विद्यालयातील स्नेहसंमेलनात समूहनृत्य सादर करताना बालवाडीतील चिमुकले.