info@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय ताईसाहेब मुलींचे टॉयलेट व बाथरूम नवीन बांधकामाचे भूमिपुजन करतांना.

आज आश्रमशाळा वारे येथे आपल्या संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय ताईसाहेब मुलींचे टॉयलेट व बाथरूम नवीन बांधकामाचे भूमिपुजन करतांना. डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालयात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. च्या सी.एस. आर. फंडातून बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे बुधवारी (दि.२७) उद्घाटन करण्यात आले. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजित सिंह यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी एचएएलचे अधिकारी शेषगिरी राव, घरड, प्रधान सहारे, एम.आर. साळू, चंद्रकांत, गोपाळ कुलकर्णी, एस.एस. चंदेल, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बीडकर, सचिव मृणाल जोशी, प्राचार्य आर.एन. जाधव, शिक्षक टोचे, डी.एन. सोनवणे, पी.एस. अहिरे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृह अधीक्षक उपस्थित होते. पेठ येथील बसस्थानक परिसरात एच.ए.एल. मार्फत अशाच प्रकारच्या स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू असल्याचे दलजित सिंह यांनी सांगितले.