support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

पेठ, ता.१२- डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, (व्यवसाय अभ्यासक्रम विभाग),पेठ येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर.एम.सर होते. या स्पर्धेचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री. सागर ए.एम सरांनी केले. प्रमुख उपस्थित पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर होते. यास्पर्धेसाठी १) स्वदेशी ते आत्मनिर्भर भारत २) भारत देशाचे नवनिर्माण हे विषय देण्यात आले होते.  या स्पर्धेच्या परिक्षणाचे काम श्री चव्हाण डी एम व श्री देसाई पी ए यांनी केले. सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सोनवणे तर आभार प्रदर्शन श्री अशोक जाधव यांनी मानले. त्याच बरोबर विद्यालयात याच उपक्रमा अंतर्गत ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सावानिमित्त स्वतंत्र भारत या विषयावर रांगोळी काढण्यात अाल्या.

त्याच बरोबर विद्यालयात आज ५ वी ते १२ पर्यंतच्या प्रत्येक वर्गात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच 'अंमली पदार्थ विरोधी' प्रतिज्ञा घेण्यत आली. त्याच बरोबर तालुकास्तरिय बाल चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. यासर्व कार्यक्रमातसाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर एम सर, उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम.सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम.एस.सर उपप्राचार्य श्रीमती पवार जे पी मॅडम सर्व प्राध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभाग घेतला.