support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

शिक्षक दिन उत्साहात साजरा

शिक्षक दिन उत्साहात साजरा
पेठ, ता. ५- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शाळेत एका दिवसाचे अध्यापनाचे काम विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांमधुन मुख्याध्यापक -कु. दिक्षा कस्तुरे, उपमुख्याध्यापक- कु. रेखा टोपले, पर्यवेक्षक - जयश्री गुजर यांनी काम पाहिले. यावेळी परिपाठापासून सर्व नियोजन विद्यार्थ्यांनी केले. 
     त्यानंतर आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. पाटील आर एम सर होते. यात सर्व प्रथम डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सरस्वती, कर्मवीर दादासाहेब बिडकर, डाॅ. विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. नंतर काही विद्यार्थी शिक्षकांनी आपले अनुभव कथन केले. त्यानंतर उपमुख्याध्यापक श्री सागर ए. एम. पर्यवेक्षक श्री मोरे एम. एस., श्री. केला डी जी, श्री. ज्ञानेश्वर सोनवणे, श्री. चंद्रकांत केदार, श्रीमती सुरेखा पवार यांनी शिक्षक दिनानिमित्त निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी  श्री पाटील आर एम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम व मेहनतीने यश संपादन करावे हे सांगितले. याकार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार कु. पठाडे प्रांजल व कु. शेख सानिया यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री जाधव अशोक, श्री ज्ञानेश्वर सोनवणे, श्रीमती सुरेखा पवार, श्री चंद्रकांत केदार व सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.