डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा
पेठ, ता- ९ डांग सेवा मंडळ नाशिक संचालित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर एम सर होते. यावेळी सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर राघोजी भांगरे, कर्मवीर दादासाहेब बिडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमा पूजन केले. त्यानंतर श्री वाघमारे जे. एच. यांनी जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यानंतर बाबाजी अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन यांचे महत्त्व प्रतिपादन केले. त्यानंतर पेठ शहरात असणाऱ्या भगवान राजे यांच्या समाधीचे पूजन मुख्याध्यापक श्री पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री धात्रक एस सी सर व सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर विद्यालय ते स्मारक विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक उपप्राचार्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीची सांगता विद्यालयात करण्यात आली. या सर्व कार्यक्रमासाठी उपप्राचार्य श्रीमती आचार्य व्ही सी, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख श्री वेढणे पी. आर. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह अधीक्षक श्री सूर्यवंशी जे सी, श्री दोडे व्ही एस, व विद्यार्थी सहभागी झाले.