डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी
*डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री आर.एम.पाटील सर होते. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षक यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. शेवटी श्री.आर.एम.पाटील यांनी म.फुले यांच्या जीवन व कार्याचा परिचय करुन दिला. या कार्यक्रमास उपप्राचार्या श्रीमती पवार जे.पी. उपमुख्याध्यापक श्री.सागर ए.एम., पर्यवेक्षक श्री.केला डी.जी.व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोनवणे डी.एन यांनी केले.