स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी
पेठ, ता.१२- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल, पेठ येथे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी विवेकानंद यांची जयंती, राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावॆळी प्रथम स्वामी विवेकानंद व डाॅ. विजयजी बिडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यात २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर पर्यवेक्षक श्री केला डी. जी., श्री कुलकर्णी एस.एस. यांनी आपल्या मनोगतातुन स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा परिचय करुन दिला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सागर ए.एम. सर यांचे अध्यक्षीय मनोगत झाले. यात त्यांनी या दोन्हीही महान विभूतींच्या कार्याचे व विचारांचे अनुकरण करावे असा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूंत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सोनवणे व आभार श्री पगार सी.बी. यांनी मानले.
या युवा सप्ताहाचे औचित्य साधून विद्यालयात युवा सप्ताह साजरा करण्यात आला. यात वेगवेगळ्या स्वरूपाच्या अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात रांगोळी, चित्रकला, वक्तृत्त्व, अभिवाचन, सुंदर हस्ताक्षर, निबंध, संगीत खुर्ची, ओझ्या इतके ओझे, बुक बॅलन्स, लिंबू चमचा, कब्बड्डी, खो-खो, फास्ट वादी, पोते शर्यत, तीन यायोगे शर्यत इ. स्पर्धा घेण्या आल्या. तसेच स्लो सायकल व मॅरेथाॅन स्पर्धा पुढे आयोजित करण्यात आल्या आहेत.