डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे आज दिनांक 12-01-2023 वार -गुरुवार राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री. पाटील आर. एम. सर होते या प्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर गाणी सादर केली तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर माहिती सांगितली, यावेळी विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी उपप्राचार्य श्रीमती पवार जे. पी., श्रीमती पठाडे व्ही. सी. श्री. खुरकुटे जी. एन. विद्यालयचे पर्यवेक्षक श्री.केला डी. जी. यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दल आपल्या मनोगतातुन माहिती दिली. शेवटी अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री.पाटील सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री सागर ए.एम. पर्यवेक्षक श्री केला डी.जी. उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी. श्री वेढणे पी आर. सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. श्रीमती आचार्य व्ही. सी. यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या व श्रीम. पवार एस. सी. यांनी माध्यमिक विभागाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व श्री.पगार सी. बी. यांनी आभार मानले.