डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,पेठ येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
आज दिनांक 15/02/2024 वार गुरुवार रोजी डॉ .विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.यावेळी डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्षा मा.हेमलताताई बिडकर विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.एम.पाटील, उपप्राचार्य श्रीमती जे.पी.पवार, उपमुख्याध्यापक श्री अनिलकुमार सागर,पर्यवेक्षक श्री.दिलीप केला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री टोचे सर,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री मनोजजी गुंजाळ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महेशजी डबे ,स्काऊट गाईड संघाचे मार्गदर्शक यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील सर यांनी केले.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.मनोजजी गुंजाळ यांनीही आपल्या मनोगतातून शाळेतील विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा *मा.ताईसाहेब यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले . त्यानंतर वर्षभरातील विविध कार्यक्रमांच्या सहभागाबद्दल विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र,मेडल व पुस्तक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोनवणे डी.एन.यांनी केले. व आभार श्री.सी.बी.पगार यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.