डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे सन 2023 - 24 या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.व १० वी १२ वी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. प्राचार्य श्री.राजेंद्र पाटील यांनी भावी आयुष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोनवणे डी.एन यांनी केले यांनी केले.