support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे विजयश्री मॅरेथाॅन स्पर्धा संपन्न

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे विजयश्री मॅरेथाॅन स्पर्धा संपन्न
पेठ, ता. २१ - डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात वेगवेगळ्या स्पर्धां घेण्यात आल्या.   त्यातीलच आज  विजयश्री मॅरेथाॅन स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व डाॅ. विजयजी बिडकर यांच्या पुतळ्याचे व कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.  यावेळी उपमुख्याध्यापक श्री सागर ए. एम. पर्यवेक्षक श्री केला डी. जी. उपप्राचार्य श्रीमती पवार जे. पी., श्री. वेढणे पी. आर., सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 
     यास्पर्धेत ५ वी ते ७ वी मुले - मुली, ८ वी ते १० वी मुले-मुली मुली व ११ वी ते १२ वी मुले-मुली असे गट करण्यात आले होते. यात पुढील विद्यार्थी विजेते झाले. 
इ. ५ वी ते ७ वी गट मुले
रेहान मोहम्मद शहा - ७ वी - प्रथम
संदीप कांतीलाल कडाळी ६ वी- द्वितीय
वेद सुभाष निंबारे ७ वी - तृतीय
इ. ५ वी ते ७ वी गट मुली
अर्चना महेंद्र थाळकर - प्रथम
कल्पना देविदास निंबारे - द्वितीय
रूपाली प्रभाकर कोदी - तृतीय
इ. ८ वी ते १० मुले
मयुर शांताराम चौधरी - ९ वी अ प्रथम
प्रल्हाद महेंद्र गायकवाड १० वी अ द्वितीय
महेश नामदेव गहले १० वी अ तृतीय
इ. ८ वी ते १० मुली
झांजर जयश्री रोहिदास ९ क - प्रथम
पवार मंगला मधुकर १० क द्वितीय
शिंगाडे सोनाली जगन ९ अ तृतीय
इ. ११ वी १२ वी मुले
दरोडे उमेश. बाळू १२ विज्ञान - प्रथम
चौधरी निलेश कृष्णा १२ क द्वितीय
आवारी कृष्णा निवृत्ती १२ वी सं. तृतीय
इ. ११ वी १२ वी मुली
मनिषा राजाराम हिलीम ११ ड- प्रथम
संगीताच्या लक्ष्मण मोरे १२ ब- द्वितीय
वनिता दिलीप मोरे ११ ड - तृतीय
     या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री पठाडे चंद्रशेखर व श्री पगार चंद्रभान तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.