दिनांक 23/8/2022 रोजी विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली व सहविचार सभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. पाटील सर होते. विज्ञान शिक्षक श्री केला सर यांनी विज्ञान छंद मंडळा अंतर्गत वर्षभरात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहीती दिली व श्री . पाटील सरांनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषया बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. या सहविचार सभेसाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक. श्री. सागर सर व पर्यवेक्षक श्री. मोरे सर आणि सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
