डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे मराठी राजभाषा दिवस साजरा
पेठ ता. 27- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम. सर होते. यावेळी सर्व प्रथम कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री कुलकर्णी एस. एस. श्रीमती हाडपे एम.सी., श्री बाबाजी आहिरे, श्री केला डी जी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पाटील सर यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यातून कुसुमाग्रज यांच्या कार्याचा परिचय करून दिला. यावेळी उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम. श्री वेढने पी आर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.