डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
पेठ, ता. २९- डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ, दादासाहेब बिडकर इंग्लिश मिडिअम स्कूल व वसतिगृह विभाग, पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्ष मा.श्रीमती हेमलताताई बिडकर या अध्यक्षस्थानी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक श्री श्रीकृष्ण चंद्रात्रे, श्री. अ.प्र.देशपांडे, प्राचार्य श्री आर.बी.टोचे, श्री दिलीप गुंजाळ, श्री. महेश डबे, श्री. डाॅ. कमलेश भरसट, श्रीमती. स्वप्नाली डोगमाने, श्री. कांतीलाल राऊत, श्री बापू पाटील, केंद्रप्रमुख श्री रामदास शिंदे हे होते. मुख्याध्यापक श्री. राजेंद्र पाटील, श्री गौरव बागुल, उपमुख्याध्यापक श्री. अनिलकुमार सागर, उपप्राचार्य श्रीमती जयश्री पवार, पर्यवेक्षक श्री दिलीप केला, श्री प्रशांत वेढणे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वी झाला. यासाठी अधिक्षक श्री जितेंद्र सुर्यवंशी, श्री विनायक दोडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय सोनवणे व श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.