support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

स्व.कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न.

स्व.कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न.
 पेठ, ता.७- डांग सेवा मंडळ, नाशिक संस्थास्तरिय स्व. कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम प्रतिमापुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. नंतर सर्व खेळाडुंना क्रीडा शपथ देण्यात आली. त्यानंतर ५ माध्यमिक विद्यालय व ७ आश्रमशाळा यांनी सामुहीक संचलन केले. 
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती हेमलताताई बिडकर तर उद्घाटक म्हणून  श्री. आर. आर.पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अदिवासी विकास भवन, कळवण हे  होते. याप्रसंगी श्री पाटील साहेबांनी विद्यार्थ्यांना खेळांचे महत्त्व प्रतिपादन केले व सर्व खेळाडूंनी संघ भावनेने खेळावे असे आवाहन केले. डांग सेवा मंडळ संस्थेचे कार्य खरोखर कौतुकास्पद असुन संस्थेचे कार्याला व सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. या क्रीडा स्पर्धेचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र पाटील यांनी केले. 
     या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पेठ शहराचे नगराध्यक्ष श्री करण करवंदे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री दामु पांडू ठाकरे, सचिव अॅड. सौ. मृणालताई जोशी, संचालक श्री प्रभाकर पवार, श्री श्रीकृष्ण चंद्रात्रे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री महेश रहाणे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर.बी.टोचे, पत्रकार श्री. सुनील धोंडगे, राहुल गाडगीळ उपस्थित होते. 
     ही स्पर्धा मुलं व मुली अशा दोन गटात झाल्या. यात मुलांच्या गटात प्रथम क्रमांक माध्यमिक विद्यालय बा-हे व उपविजेता अाश्रम शाळा वा-हे व मुलींच्या गटात प्रथम जनता विद्यालय अभोणा व उपविजेता जनता विद्यालय मुल्हेर च्या संघाला मिळाले. तसेच संचलनात प्रथम आश्रम शाळा उंबरठाण, द्वितीय जनता विद्यालय अभोणा व उत्तेजनार्थ आश्रम शाळा कुकुडणेचा संघ विजेता ठरला. 
     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील राजेंद्र, उपमुख्याध्यापक श्री अनिलकुमार सागर, पर्यवेक्षक श्री दिलीप केला, उपप्राचार्य श्रीमती जयश्री पवार, श्री. प्रशांत वेढणे, क्रीडा शिक्षक श्री चंद्रशेखर पठाडे, श्री चंद्रभान पगार, वसतिगृह अधिक्षक श्री जितेंद्र सुर्यवंशी, श्री विनायक दोडे, श्रीमती स्वाती पाटील, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ. नरेंद्र पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. शेवटी वंदेमारम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.