support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर विद्यालयात भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा - २०२२ चे आयोजन

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर विद्यालयात भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा - २०२२ चे आयोजन
        मुल्हेर ता. १७- अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज, हरिद्वार व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने,जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर येथे विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्यांचा विकास करणे, त्यांच्यात सांस्कृतिक संवेदना जागृत करणे, भारतीय संस्कृतीचा परिचय करुन देणे, सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांना दैनंदिन जीवनात स्थान देणे इ. उद्देश डोळ्यासमोर ठेवुन भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत इ.८ वी ते १२ वी पर्यंतची एकुण १४६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात इ. ८ वी - २०, इ. ९ वी - २७, इ. १० वी - ४६, इ.११ वी ३० व इ. १२ वी २३ समावेश आहे.  या परीक्षेसाठी डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती हेमलताताई बिडकर, संस्थेचे संचालक श्री अ.प्र.देशपांडे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डांग सेवा मंडळ,संस्थेचे संचालक श्री-अनिलजी पंडित भाऊसाहेब, विद्यालयाचे प्राचार्य.श्री-नंदन सर यांच्या उपस्थितीत परीक्षा सुरळीत पार पडली.