support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

जनता विद्यालय मुल्हेर येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा

 

         

            डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय मुल्हेर येथे थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री ए. एल. नंदन हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक श्री अनिल पंडित, पर्यवेक्षक श्री एस.सी. धात्रक हे उपस्थित होते. यावेळी प्रतिमा पूजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रामानुजन यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली. तसेच काही विद्यार्थ्यांनी गणित गीत सादर केले. यावेळी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शिक्षकांच्या वतीने उपशिक्षक श्री एन.के.जाधव यांनी रामानुजन यांच्या कार्या बरोबरच त्यांनी तयार केलेल्या प्रमेय यांची माहिती दिली.  श्री एस.एस.चौधरी यांनी रामानुजन यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.  प्राचार्य नंदन सर यांनी गणित विषयाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त करून रामानुजन यांच्या शालेय जिवनातील  गणित विषयातील विविध प्रसंगांची माहिती  दिली. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.