support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

जनता विद्यालय मुल्हेर च्या विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय क्रिडास्पर्धेत घवघवीत यश

जनता विद्यालय मुल्हेर च्या विद्यार्थ्यांचे तालुका स्तरीय क्रिडास्पर्धेत घवघवीत यश

         

            

       डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथिल विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या बागलाण तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विशेष यश संपादन केले.
सटाणा येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत १४वर्ष वयोगटात 
दिव्या पुंडलिक बागुल उंचउडी प्रथम, 
महिमा उत्तम चौधरी थाळीफेक प्रथम, 
समिक्षा दिलीप मेश्राम ४००मिटर धावणे द्वितीय, 
उदयन राहुल बागुल १००मीटर व ६००मीटर धावणे तृतीय, 
१७वर्ष वयोगटात 
पवन पोपट गायकवाड ८००मिटर धावणे प्रथम, 
शत्रुघ्न मनोहर चौरे ४००मिटर धावणे प्रथम, 
उद्धवेश निंबा जगताप थाळीफेक प्रथम, 
जयमाला दादाजी बर्डे भालाफेक प्रथम, 
दिपाली अशोक सूर्यवंशी ८००मीटर धावणे प्रथम, 
जयश्री भगवान अहिरे १५००मीटर धावणे प्रथम व गोळाफेक द्वितीय, 
निखिल संजय कुटे भालाफेक व १५००मीटर धावणे द्वितीय,
दिपाली दिलीप पवार ४००मीटर धावणे द्वितीय, 
१९वर्ष वयोगटात 
करण सोमा सोनवणे २००मीटर प्रथम, 
गणेश भिवसन अहिरे लांबउडी द्वितीय क्रमांक मिळविला. सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक आर. एस. अहिरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सर्व  यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर, उपाध्यक्ष श्री दामुकाका ठाकरे, सचिव सौ. मृणालताई जोशी, संचालक श्री अनिल पंडित, प्राचार्य श्री. ए.एल. नंदन, पर्यवेक्षक श्री. सुनील धात्रक, पालक संघाचे उपाध्यक्ष श्री शरदजी गांगुर्डे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री मनोज अहिरे तसेच  सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.