[email protected] +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

स्व. कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव संपन्न

स्व. कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव संपन्न

         शुक्रवार दि. 5 जानेवारी 2024 डाग सेवा मंडळ नाशिक आयोजित स्व. कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव जनता विद्यालय व कनिष्ठ   महाविद्यालय मुल्हेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या क्रीडामहोत्सवाचे अध्यक्षस्थान डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा मा.हेमलताई बिडकर यांनी भुषविले तर उदघाटक म्हणुन  बागलाणचे आमदार मा.श्री. दिलीपजी बोरसे हे होते. या क्रीडा महोत्सवासाठी  प्रमुख पाहुणे म्हणुन आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते कु.दिलीप गावित तसेच त्यांचे मार्गदर्शक श्री. वैजनाथ काळे सर, मुल्हेर गावचे  उपसरपंच श्री.योगेश सोनवणे डांग सेवा मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री. दामुकाका ठाकरे, सचिव- मा.सौ. मृणालताई जोशी, संचालक .श्री प्रभाकर पवार, श्री. अरविंद देशपांडे, श्री. श्रीकृष्ण चंद्रात्रे सेवक संचालक, श्री. अनिल पंडीत आ.वि.का सोसायटी,मुल्हेर चे उपसभापती श्री. सुरेश आहिरे, ग्रामपंचायत सद्स्य श्री. विजय पवार, श्रीमती. सुनिता गर्गे साजाजिक कार्यकर्ते श्री. सतिश शुक्ल श्री. बन्सीलाल बत्तिसे श्री. दत्ता येवला श्री. शिवाजी जाधव हे होते.

                 क्रीडा महोत्सवाची सुरूवात कार्यक्रमाचे अध्यक्ष, उदघाटक व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते बलदेवता हनुमान, कर्मवीर दादासाहेब बिडकर व डॉ. विजय बिडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागतगीताने प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे स्वागत केले. या स्वागत गीतातून प्रमुख मान्यवरांचे मनं जिंकून आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.

प्रतिमापुजन करतांना

मा.श्री. वैजनाथ काळे सर

या नंतर क्रीडामहोत्सवाचे उदघाटकबागलाणचे आमदार मा.श्री. दिलीपजी बोरसे साहेब यांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. नंतर सर्व खेळाडू व उपस्थितांनी ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे  उदघाटकश्री. दिलीप बोरसे साहेब व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करण्यात आली. याप्रसंगी सर्व प्रमुख मान्यवरांनी शांती संदेश देण्यासाठी आकाशात शांतीदूत म्हणून फुगे सोडून खेळाडू आणि खेळासाठी शांती असावी असा संदेश दिला. नंतर विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री भामरे वाय पी. यांनी मान्यवरांना मानवंदना देऊन संचलन सुरु करण्याची परवानगी घेतली. याप्रसंगी डांग सेवा मंडळाच्या सर्व ­­शाखांमधील पेठ, आंबेगण, उंबरठाण, बाहे, धांद्रीपाडा, अभोणा, ओतूर, मुल्हेर, सुळे, वारे, कुकुडणे, शिंदे शाळांतील मुले व मुली मिळुन २४ संघांनी सामुहीक संचलन सादर करुन सर्व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी प्रत्येक संघाने आपल्या शाळेचा ध्वज हातात घेतला होता व प्रत्येक संघाने वेगवेगळा पोषाख परिधान केला होता. खरोखर हे दृश्य जणू स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाचे लालकिल्यावरील संचलन आहे असेच प्रत्यक्षात वाटत होते. यात उत्कृष्ट संचलनाचे प्रथम, व्दितीय, तृतीय  क्रमांक काढले. संचलन संपल्यानंतर सर्व शाळांचे संघ आपापल्या जागेवर आसनस्थ झाले संचलनानंतर सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नंदन सर यांनी क्रीडामहोत्सवाचे प्रास्ताविकातुन कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यात क्रीडा महोत्सवाचे यजमान पद आमच्याशाळेला दिल्यामुळे संस्थेच्या अध्यक्षा मा. बिडकर यांचे आभार मानले व सर्व अतिथी मान्यवरांचे शब्द सुमनांनी केले या प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या स्थापनेची सामाजिक व शैक्षणिक ध्येय आणि त्यासाठीचे कर्तव्य करणारी बिडकर कुटुंबीयांचे कार्य संस्थेचा वाढता आलेख यांचा गौरव यांचा गौरवशाली इतिहास सांगितला तसेच संस्थेतील यशस्वी आंतरराष्ट्रिय ऑलंपिक सुवर्ण पदक खेळाडू कु. दिलीप गावित, कविता राऊत या सारख्या अनेक खेळाडूंची यशोगाथा आपल्या प्रास्ताविकातुन सांगितली. 

 

क्रीडा महोत्सवाचे हे सोळावे वर्ष असुन विद्यार्थ्यांमधे संघ भावना निर्माण व्हावी या दृष्टिने सांघिक स्पर्धांचे आयोजन हे केले जात असल्याचे सर्व खेळाडूंनी संघ भावना ठेऊन खेळावे पंचाचा निर्णय हा अंतिम राहील काही तक्रार असल्यास आयोजक समिती कडे  करावी असे नमुद केले सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या

      क्रीडा महोत्सवात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.  बागलाणचे आमदार श्री. दिलीप बोरसे  यांचा सत्कार डांगसेवा मंडळाचे अध्यक्षा मा. ताईसाहेब यांनी शाल व पुष्प गुच्छ् देऊन केला. आंतर राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता खेळाडू कु.दिलीप गावित तसेच प्रक्षिक्षक श्री. वैजनाथ काळे सर व उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य श्री. ए.एल. नंदन सर व पर्यवेक्षक श्री. एस.सी. धात्रक सर यांनी केला. नंतर अभोणा विद्यालयातील विद्यर्थिनींनी  शिवकालिन मर्दानी खेळ सादर केला. त्यानंतर प्रक्षिक्षक श्री. वैजनाथ काळे सर यांनी खेळाडु दिलीप गावित यांचा सुवर्ण पदकापर्यंतचा संघर्ष भाषणातुन वर्णन केला.  तसेच खेळाची महती त्यांनी सांगितली खेळातुन विद्यार्थ्यांचा विकास कसा साधता येऊ शकतो याबद्द्ल माहिती दिली.