support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

जनता विद्यालय मुल्हेर येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी

       डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय मुल्हेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सुनिल धात्रक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक श्री अनिल पंडित हे होते.

        ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विद्यालयातील उपशिक्षक श्री एस.के.पगार, श्री एन.के.जाधव, श्रीमती जे.आर.ब्राह्मणकार यांनी सावित्रीबाई यांच्या जीवन कार्याची माहिती आपल्या मनोगतातुन मांडली. विद्यालयातील काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई यांची वेशभूषा केली होती.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सी.जी.येवला यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.