विद्यालयात आज 10 विच्या विद्यार्थ्यांचा परिक्षेस शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम होता. आज पर्यंत केलेली मस्ती घेतलेले शिक्षण आठवण आणि गुरुजनांबद्दल आदर व्यक्त..
करत उत्साहपुर्वक वातावरणात हा समारंभ पार पाडला,
10 वी संपली आता पुढे काय याच चिंतेत किती तरी विद्यार्थी असतात , कारण आपले करिअर घडविणारे पुढील 5-8 वर्ष
आपल्या आयुष्यासाठी गरजेचे असतात. पण 10 विला तुम्ही तुम्ही या विषयावर खुप विचार करण्याची गरज नाही. 12 वी करे पर्यंत
आपल्याला काय आवडते आपल्या आतली उर्जा काय हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आपले आंतारमन कोणत्यागोष्टी करण्यासाठी
ओढ घेते हे तपासा हे माहिती झाल्यानंतर आपल्या त्या बाबतीत क्षमता आहे का? हा प्रश्न विचारुन बघा पण हे सर्व पुढिल 2 वर्षात
लक्षपुर्वक तपासुन बघा आत्ता उगाच
"हा" सांगतो म्हणून कुठलाही करिअर संदर्भात निर्माण घेऊ नका . कारण प्रत्येक सांगनाऱ्याचे
निर्यण हे त्यांच्या स्वत:च्या किंवा इतरांच्या बघण्यावर अबलंबुन असते. आपल्या बाबतीत ते लागु पडतील असे नाही.
(मार्गदर्शक वेगळा आणि सांगणारा वेगळा)
तुम्ही आर्ट घेतल तर कॉमर्स घ्यायला पाहिजे होत.
कॉमर्स घेतल तर सायंन्स पाहिजे होत.
हे घेतल असेल तर त्या पेक्षा हे घ्यायला पाहिजे होत हे बर, असे विविध गोष्टी आता तुम्हाला एकायला मिळतील
किंवा सुरुवात देखील झाली असेल.
पण आपल्या मना:ला काय वाटते हे बघा आणि गोंधळून जाऊ नका.
#आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष कृती आणि प्रयत्न
अत्यंत महत्वाची भुमिका बजावतात, यालाच अजुन योग्य व्यक्तीचे
अनुभव आणि मार्गदर्शन मिळाले की यशस्वी आयुष्य आणि
हवे तसे जीवन आपणास जगता येऊ शकते.
पुढ़िल वाटचालीस आपणास मन:पुर्वक शुभेच्छा.