शिव जनमोत्सव जनता विद्यालयात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शाळेत फलक लेखन करण्यात आले . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमा पुजन करुन मानवंदना दिली.
या नंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराजांचा जीवनावर मोठ्या उत्साहात भाषणं केली. विद्यार्थ्यांनी केलेली भाषणे कानावर पडून शाळेतील वातावरण देखील शिवमय झालेले होते.